ईव्हीएमविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून सह्यांची मोहीम

By Raigad Times    17-Dec-2024
Total Views |
 KARJT
 
कर्जत । वंचित बहुजन आघाडीचे वतीने कर्जत मतदारसंघात ईव्हीएम मशीन विरोधात सह्यांची मोफीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात नेरळ येथे झाली आहे. नेरळ गावातीलस ख्या ग्रामस्थांनी या सह्यान्च्या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला आहे. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या आदेशाने, जिल्हा महासचिव धर्में द्र मोरे नेतृत्वाखाली कर्जत - नेरळ येथे स्वक्षरी मोहीम राबविण्यात आली.
 
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएमविरोधी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
 
रायगड जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. कर्जत मतदारसंघात खोपोली आणि नेरळ येथे पहिल्या टप्प्यात इव्हेंट विरोधात सह्या घेण्यात आल्या. या आंदोलनात रायगड मधल्या जागृत मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आव्हान रायगड जिल्हा महसचिव धर्मेंद्र मोरे यांनी केले होते.
 
त्यांच्या आवाहनानुसार कर्जत मध्ये हजारो लोकांनी स्वाक्षरी करून ईव्हीएम वरोध नोंदवला सदर स्वाक्षरी मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे, जिल्हा सल्लगार हरिचंद्र यादव, जिल्हा संघटक सुनील गायकवाड,तालुका महसचिव प्रदीप ढोले,तालुका उपाध्यक्ष आनंद खैरे,कर्जत शहर अध्यक्ष लोकेश यादव, नेरळ शहर अध्यक्ष मुकेश गायकवाड, सचिव संजय मोरे,संघटक प्रथमेश पवार, प्रज्वल गायकवाड आदी उपस्थित होते.