विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा.राम शिंदे यांची निवड

By Raigad Times    20-Dec-2024
Total Views |
 nagpur
 
नागपूर | विधानपरिषदेच्या १९ व्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रा. राम शिंदे यांना सभापतीच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेऊन गेले.
 
विधानपरिषदेच्या सभापतीपदी विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्य श्रीकांत भारतीय, उमा खापरे व शिवाजीराव गर्जे यांनी मांडला. त्यास सदस्य मनीषा कायंदे, सदस्य अमोल मिटकरी व सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी प्रा. राम शिंदे यांचा परिचय करून दिला.