मुरुड जंजिरा । मेरीटाईम बोर्डाने जंजिरा किल्ल्यात जाणार्या पर्यटकांसाठी खास 400 वाहने पार्कींग होतील अशी 1 कोटी खर्चून पार्किंग बनवली आहे व 8 कोटी खर्चून नुतन जेटी तयार होत आहे, परंतु जेटीच्या अंतिम कामात जेटीवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुरक्षा कठडे बांधण्यात आले त्यासाठी वापरण्यात आलेले लोखंडी पोल अतिशय गांजलेले असल्याने अशा कामाला जनतेचा विरोध आहे.
खरं तर मुरुडला पर्यटन विकासासाठी खोरा बंदर महत्वाचे ठिकाण आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जलवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. एकावेळी सलग सुटीत हजारो पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येतात. त्यावेळी वाहतूक कोंडी होते. जेटीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक उभे राहतात.
त्यांच्या सुरक्षेसाठी बनणारे कठडे हे मजबूत असायला हवेत कारण कठडा तुटला तर अपघात होण्याची भीती आहे. तातडीने होणारे काम थांबवून चांगल्या प्रतीचे काम करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. याकडे खोरा बंदरातील खराब कामाची तक्रार केली आहे, तात्काळ पाहाणी करून चुकीचे काम काढून काम चांगल्या दर्जाचे काम करण्याची जबाबदारी मेरिटाईम बोर्डाची आहे. -सुधीर देवरेेे, मेरीटाईम बोर्ड अधिकारी