पेणकरांच्या दणक्यानंतर परप्रांतीय महिलेचा माफीनामा

By Raigad Times    23-Dec-2024
Total Views |
 pen
 
पेण | ‘मै मराठी नही बोलुंगी, तुम हिंदी बोलो. जब इन लोगो को यूपीवाले नही चलते तो पाप धोने काशी - बनारस नहाने क्यू जाते हो? हमारे मे दम है इस लिये यहाँ आकर धंदा करते है. तुम मे दम है तो यूपी में जाकर कमाव खाओ रहो’ अशी अर्वाच्य भाषेत मराठी दांपत्याशी अरेरावी करीत असलेला एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. पेण शहरातील राजू पोटे मार्गावर सदर परप्रांतीय महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. अनेक वेळेला ती ग्राहकांशी वाद घालते.
 
शहरातील एक दांपत्य या महिलेकडे दोन किलो टोमॅटो घेण्याकरिता गेले होते. त्यावेळेला या महिलेला मराठीत बोल असे सांगितले असता तिने चढ्या आवाजात दादागिरी करीत मराठी दाम्पत्याला अरेरावी केली. पोलिसांचा धाक दाखवून दादागिरी करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच; पेणकरांच्या पुढाकाराने या परप्रांतीय उद्धट महिलेला तिच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन जाब विचारला.
 
अंती अजय विश्वकर्मा (वय ३६) रा. फरस डोंगरी पेण ही परप्रांतीय महिला २००६ पासून पेण येथे राहत असून ती शहरातील राजू पोटे मार्गावर अनधिकृतपणे रस्त्यावर हातगाडी लावून भाजीचा व्यवसाय करते. अनेक वेळा ती स्थानिक नागरिकांशी भांडणे करते. हिंदी राष्ट्रीय भाषा म्हणत मराठीचा द्वेष करणार्‍या परप्रांतीय भाजी विक्रेत्या महिलेला पेण करांनी दणका देताच तिची बोबडीच वळली. मला माफ करा मी मराठीचा द्वेष करणार नाही.
 
मी लेखी माफीनामा लिहून देते असे म्हणत या परप्रांतीय महिलेने पेण पोलीस ठाण्यात माफीनामा लिहून दिला.पेणकर सदर महिलेविरोधात पेण पोलीस ठाण्यात तसेच पेण नगरपरिषदेत लेखी तक्रार दिली असून पोलिसांनी तातडीने या महिलेला ताब्यात घेतले आहे तसेच तिचा भाजी विक्रीचा अनधिकृत धंदा तूर्त बंद करण्यात आला आहे. अजय विश्वकर्मा या परप्रांतीय महिलेने शहरातील फणस डोंगरी येथे बांधलेले तिचे घर अधिकृत आहे की अनधिकृत? याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.