खारी/ रोहा | पर्यावरणातील ऋतू बदलानुसार वातावरणीय बदलामुळे होणारे ताप सर्दी पडसे खोकला आदी संसर्गजन्य आजारामध्ये वाढ होत असून संपूर्ण दिवसभर वातावरणामध्ये थंड - थंड गारवा जाणवत असल्याने वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी दम्याचे रुग्ण त्रस्त झाले आहेत. साधारण पावसाचे वातावरण शांत न होतो तो होतो तोच सर्वांच्या आवडीचा हिवाळा थंडीचा मौसम आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागला खोकला.
आहा आहा.. पहाटेच्या प्रहरी सर्वत्र धूका मागील आठ दिवसांपासून एकदम थंडीचा जोर वाढलयाने गावा-गावांमधून चौका - चौकामध्ये शेकोटी पेटवली जात असून त्याभोवती वयोवृध्द घोंगडी ब्लँकेट गुंडाळून तर तरुणवर्ग, बाळ- गोपाळ थंडीचा बचाव करण्याकरिता गरमा गरम उष्णतेसाठी शेकोटीचा आधार घेत गप्पा टप्पा, विनोद जोग मज्जा मस्ती एकमेकाची चेष्टा - मस्करी करत शेकोटी मध्ये रद्दी पेपर कागद, जळाऊ लाकूड पाळा- पाचोळा, रिकामे टाकाऊ पॉकेटस् आदींचा वापर करून शेकोटीचा ज्वाल सर्वांगांनी शेक घेत चहा - बटर खाण्याची मज्जा काही औंरच सकाळी दहा वाजेपर्यंत तरी सूर्यनारायणाचे दर्शन होत नाही असे ज्येष्ठ नागरिक बोलत आहेत.
हिवाळी रब्बी हंगामातील कडधान्ये पाले भाजी थंडीचा मौसमाचे वातावरण पोषक असल्याने वाल मुग मटकी, हरभरा, चवळी आदी कडधान्ये तर कांदा मुला-पालक - मेथी - माठाची पालेभाजी, दुधी- भोपळा- घेवडा - कार्ले भेंडी कोथांबिर, मिरची - वांग्याचे तुरीचे रोपांची वाढ जलदगतीने व झपाट्याने होताना दिसत असल्याने नगदी उत्पादक पिकांमुळे झटपट आर्थिक उत्पन्न चालू होते त्यामुळे बळीराजा सुखावला आहे असे रोहा वरसगाव येथील प्रगतिशील व कृषिनिष्ठ शेतकरी अनिल मोहन सानप, रुपेश देवाजी शिंदे, राजेंद्र नारायण जाधव, राम देवकर तळाघर - बाहे रोहा यांनी माहिती देताना सांगितले.
वातावरणीय बदलामुळे होणारे ताप सर्दी पडसे खोकला आदी संसर्गजन्य आजारामध्ये वाढ होत असून संपूर्ण दिवसभर वातावरणामध्ये थंड - थंड गारवा जाणवत असल्याने वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी दम्याचे रुग्ण त्रस्त झाले असून तज्ञ डॉटरांच्यासल्ल्यानुसारच दवा औषधे घेण्याचे आवाहन -डॉ.जगदीश कदम, फिजिशियन