खोपोली | कॉलेजमध्ये येताना जाताना किंवा गावाच्या परिसरात अपघात झाला तर कोणाच्या मदतीची वाट न पाहता आपण आपतग्रस्तांना मदत करा, पोलीस अग्निशमन यंत्रणा १०८ रुग्णवाहिका यांना मोबाईल वरून संपर्क करा आणि जनतेला मदत करून जिल्हा प्रशासनाला प्रशासनाला सहाय्य करून अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी मदत करा असे अवाहन डॉ.जयपाल पाटील यांनी निवासी शिबीराच्यावेळी बोलताना केले आहे.
के.एम सी कॉलेजच्या एनएसएस विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक १० डिसेंबर ते १६ डिसेंबर विठ्ठल रुमाई मंदिर निसर्गरम्य ठिकाणी होराळे येथे प्राचार्य प्रिन्सिपल डी.पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते. निवासी शिबीरात ६५ विद्यार्थ्यी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
मार्गदर्शक डॉ. जयपाल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत प्रा. संजय डायरे यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात डॉ.जयपाल पाटील यांनी संविधान वाचन करून केली. समाजात वावरताना कोठेही दोन चाकी चार चाकीचा अपघात झाला तर अपघातग्रस्तांना मदत करा यासाठी रुग्णालयात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेचा वापर करा मुली व महिलांच्या सर्व क्षणासाठी महाराष्ट्र पोलिसांचा ११२ क्रमांकाचा वापर करून सुरक्षित रहा व इतरांना सांगा आपल्या परिसरातील जंगलात वनवा पेटला, तर वनखाते क्रमांक १९२६ याचा वापर करून पर्यावरणाला मदत करा गावात माहेर करीन बाळंतपणासाठी आली, असल्यास शेवटच्या क्षणी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याला १०२ क्रमांक फोन करा असे सांगितले.