राज्यातील बेकायदा होर्डिंग्स आणि बॅनर्स आवरा , आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By Raigad Times    25-Dec-2024
Total Views |
 panvel
 
मुंबई | राज्यात सर्वच पक्षीयांकडून राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जबाबत प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्वाचा निर्णय घेऊ शकता, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. अदित्य ठाकरे यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहत याकडे लक्ष वेधले आहे.
 
राज्यातील वाढत्या पोस्टर, बॅनरहोि र्डंगच्या मुद्द्याची नस पकडत त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर यावर बंदी घालण्याबाबत त्यांनीपत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. आदित्य ठाकरेंनी पत्रात २०२५ मध्ये पदार्पण करताना तसेत लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जबाबत प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्वाचा निर्णय घेऊ शकता, असे मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. ठाकरे पुढे लिहितात, एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणार्‍या अशा पोस्टर्सचा सर्वांनाच त्रास होतो आहे.
 
आपण याविषयी बैठक बोलावली तर मी आणि माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील, असे मोठे विधान आदित्य ठाकरेंनी केले आहे.