महाड | युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आजपासून महाड तालुक्यातील प्रत्येक गावांत युवा सेनेच्या नामफलकाचे अनावरण करण्याचा संकल्प युवा सेनेने ना.भरत गोगावले व युवा नेते विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली केला असल्याची माहिती युवा सेनेचे महाड तालुका प्रमुख रोहीदास उर्फ पप्या अंबावले यांनी दिली आहे.
युवा सेनेची बिजे ग्रामिण भागात रुजवण्यासाठी प्रत्येक गावात युवासेनेच्या नामफलकाचे अनावरण केले जाणार असून, आज त्याचा शुभारंभ होणार आहे.