...आणखी सात बांगलादेशी अटकेत ; पनवेल शहर पोलिसांची पळस्पे, रेल्वे स्टेशन परिसरात कारवाइ

By Raigad Times    28-Dec-2024
Total Views |
 panvel
 
पनवेल | पनवेल शहरातून आणखी सात बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी पळस्पे फाटा आणि पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून या बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात पारपत्र अधिनियमन १९५० चे कलम ३ए सह ६ए सह परकीय नागरिक आदेश १९४८ चे परिच्छेद ३(१) सह परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे कारवाई केली आहे.
 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घेवडेकर, पोलीस उपनिरीक्षक अस्पतवार, पोलीस हवालदार अमोल म्हात्रे, शैलेश जाधव, अभयसिंह पाटील आदींच्या पथकाने शहराजवळील साई वर्ल्ड सिटी कंन्स्ट्रक्शन साईड पळस्पे फाटा या ठिकाणावरुन सैफुल रशीद काझी (५३), संपद मन्नान काझी (२५), मोनिउल नुरअली सरदर (२७) यांना तर पनवेल रेल्वे स्टेशनच्या मुख्य गेटच्या बाहेरील मोकळ्या मैदानात कच्च्या झोपडीमध्ये इबादुल अफजल शेख (३८), मिथुन कौसर शेख (३०) त्याचप्रमाणे भिंगारीपाडा मराठी शाळेजवळून रिपोन शेख (२८), शेमुल शेख (२६) यांना मोबाईलसह अटक करण्यात आली आहे.