कोलाडजवळ ट्रेलरची धडक, दुचाकीस्वार ठार

By Raigad Times    03-Dec-2024
Total Views |
 kolad
 
कोलाड | मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून, सोमवारी, २ डिसेंबर रोजी सकाळी आंबेवाडी नाका येथे ट्रेलरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
 
आंबेवाडी नाका येथील शिवकांत गॅरेज व विजय वाईन शॉप दुकानासमोर हा अपघात झाला. सायरलाल खमाण गुजर (वय ३३, रा. बहादूरपुरा पो. दौलतपुरा ता. मसुदा विजयनगर जि. अजमेर राजेस्थान) हा ट्रेलर घेऊन मुंबई गोवा महामार्गाने निघाला होता. आंबेवाडी नाका येथे या ट्रेलरने मोटारसायकलला धडक दिली.
 
या अपघा- तात विजय कुमार सिन्नदुराई गोकगिलिखान (वय ३७, रा. सिन्नादुराई रा. तामिळनाडू) या जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एस ए कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस ठाण्याचे अंमलदार एस जी भोजकर, अंमलदार सी. के कुथे करीत आहेत.