माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. शनिवारी, २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इंदापूरनजीक वावे दिवाळी येथे दुचाकीला इनोव्हा कारची धडक लागून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकार लिहिलेली इनोव्हा कार व दुचाकी यांच्यामध्ये हा अपघात झाला.
रोहा तालुक्यातील महादेव वाडी येथील राजाराम अनंत धारदेवकर (वय ६४) हे दुचाकीवरुन रोहा येथून माणगावच्या दिशेने जात होते. तर इनोव्हा कार मुंबईकडून माणगावच्या दिशेने जात असताना इंदापूरनजीक वावेदिवाळी येथे या कारने धारदेवकर यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात राजाराम धारदेवकर यांना गंभीर दुखापती होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत.