धाटाव | रोहा-धाटाव-किल्ला पंचक्रोशीतीच्यावतीने लांढर येथे संपन्न झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता २७ डिसेंबर रोजी रायगडचे खा.सुनील तटकरे यांच्या तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल्याचे किर्तनाने करण्यात आली.
३९ वर्षांची अखंड यशस्वी परंपरा राखत लांढर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या सांगता समारंभाला उपस्थित खा.सुनील तटकरे यांचा पंचक्रोशी व लांढर ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला. या सप्ताह सोहळ्यात दररोज काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, प्रवचन, सामुदायिक हरिपाठ, महाप्रसाद, हरि किर्तन, जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
संपूर्ण तालुक्यातील भाविकांनी उपस्थिती नोंदवून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा लाभ घेतला. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व महिला मंडळ व आदर्श मित्र मंडळ लांढर यांनी मोलाचे सहकार्य केले.