पेण आमटेम रेल्वे लाईनजवळ आढळला मानवी सांगाडा

By Raigad Times    05-Dec-2024
Total Views |
 pen
 
पेण | पेण तालुक्यातील आमटेम गावाजवळ कोकण रेल्वेच्या लाईन जवळ स्री जातीचे माणवी हाडाचा सागाडा सापडला आहे. कोकण रेल्ववरील लाईनमन रेल्वे लाईनची पाहणी करीत आसताना आमटेम गावाजवळील रेल्वेलाईनच्या बाजुला स्री जातीची माणवी शरीराची हाडे व कवटी विखुरलेल्या स्थितीत आढळून आली.
 
याठिकाणी काळया जीर्ण झालेल्या मळकट रंगाची लेगिज, हिरवट मळकट रंगाचा टॉप आढळून आला आहे. या प्रकरणाचीनोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश गवई तपास करीत आहेत.