खोपोली | खोपोली-पाली रोडवरील उंबरे येथील एका कंपनीच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु असताना अचानक ती सहा कामगारांच्या अंगावर कोसळली. धरमदेव (वय २५), राकेश राजभर (वय २१), मंजित चव्हाण (वय २०), जितेंद्र (वय ३७), राम समूज (वय ४३), प्रेम सागर (वय २२) अशी त्यांची नावे आहेत. हे सहाही कामगार जखमी झाले.
त्यांना खोपोली येथील डॉ.जाखोटीया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यातील दोन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.