दिवेआगर सातउघडी पूल देतोय अपघाताला निमंत्रण

By Raigad Times    09-Dec-2024
Total Views |
 borli
 
बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुयातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगरला जोडणार्‍या सातउघडी येथील छोट्या पुलावरील एकाबाजूचा लोखंडी कठडा मागील अनेक दिवसांपासून तुटलेला असून यामुळे अपघाताची शयता वाढली आहे. या मार्गावर स्थानिकांच्या लहान मोठ्या वाहनांबरोबरच पर्यटनासाठी येणार्या वाहनांची संख्या शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठी असते.
 
रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्यास एखादे वाहन थेट पुलाखालील उधाणाच्या पाण्यात पडून अपघाताची शयता नाकारता येत नाही. त्यामुळे अपघाताला निमंत्रण देणार्‍या या पुलाच्या कठड्याचे, त्याचबरोबर या मार्गाची झालेली दुरावस्था यावर संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन काम मार्गी लावावे अशी मागणी स्थानिक वाहन चालक व पर्यटकांकडून होत आहे.