ताम्हिणी घाटात खाजगी बसला अपघात; १७ प्रवासी जखमी

By Raigad Times    09-Dec-2024
Total Views |
 mangoan
 
माणगाव | पुणे ते माणगावदरम्यान ताम्हिणी घाटात मध्यरात्री खाजगी प्रवासी बसला अपघात होऊन १७ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री पुण्याहून चिपळूणकडे निघालेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हिणी घाटात अपघात झाला. या अपघातात बस रस्त्याच्या कडेला पलटली.
 
अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. जखमींमध्ये स्वस्ति गायकवाड, साची गायकवाड, स्वामिनी गायकवाड, यश यादव, दक्ष गायकवाड, विक्रम गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, भावना यादव, आदेश गायकवाड, उर्मिला गायकवाड, रजनी गायकवाड, गणेश गुंजाळ, स्मिता झोंबरे, प्रविण झोंबरे, सुजल झोंबरे, समिक्षा झोंबरे, मेघा जाधव यांचा समावेश आहे.
कार अपघातामध्ये ८ प्रवासी जखम
मुंबई गोवा महामार्गावर ६ डिसेंबरच्या रात्री साडेअकरा दरम्यान माणगांव बाजारपेठेलगत मोतीराम प्लाझाच्या समोरील वळणावर एक्स एल सिक्स कार व वॅगनर कार यांच्यात अपघात झाला. यात दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला.
 
यात दोन्ही गाड्यांमधील चालकासहित ४-४ असे एकूण ८ प्रवासी जखमी झाले. हे सर्वजणमुंबईचे राहणार असून, त्यांना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले. वॅगनर कारमधील २ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईत हलविण्यात आले.