अलिबाग | समुद्रातील अवैध टिपण्यासाठी गुरुवारी राज्यातील समुद्र किनार्यावारील ९ ठिकाणांवरुन ड्रोणने उड्डाण घेतले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे झाले. अलिबाग तालुक्यातील वरसोली बीचवरुन पहिल्या ड्रोनने आकाशाकडे झेप घेतली. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी डॉ.भरात बास्टेवाड. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आले.
वरसोलीसोबतच श्रीवर्धन तालुक्यातील मूळगाव जेट्टीवरूनदेखील ड्रोन प्रणालीचे उड्डाण करण्यात आले. यावेळी कोस्टगार्डचे वरिष्ठ अधिकारी, अलिबाग येथील मत्स्य सहकारी संस्थांचे, संघाचे प्रतिनिधी, नौका मालक उपस्थित होते. रायगडसह कोकणातील सात जिल्ह्यात अत्याधुनिक ड्रोन प्रणालीद्वारे सागरी सीमांवर नजर ठेवण्यात येणार आहे. गस्ती नौकेसोबतच ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारीकरणार्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
अशा नौकांवर सागरी कायद्यांतर्गत कठोरपणे कारवाई करणे सोईचे होईल. ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे. ड्रोनचा वापर करुन मासेमारी नौकांची करुन झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होवू ड्रोनद्वारे राज्याच्या किनारपट्टीवरील क्षेत्र देखरेखीखाली येणार असल्याने हे ड्रोन सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत, जेणे करुन सागरी सुरक्षा बळकट होण्यास सुध्दा मदत होईल.
ड्रोन प्रणालीद्वारे रायगड जिल्ह्याच्या १२२ किमी लांबीच्या समुद्र किनार्यापासून राज्याच्या सागरी हद्दीपर्यंत म्हणजे १२ सागरी मैल अंतरापर्यंत ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. जिल्ह्यातील व श्रीवर्धन या दोन ठिकाणी सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन घेण्यात आली आहे. आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारीत देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचा नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित करण्यात आला आहे.