पेण | पेण शहरातील फणसडोंगरी येथे राहणार्या गणेश बाळू चुणारे (वय १४) या अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केल्याची घडली आहे. हत्या करुन या मुलाचा मृतदेह झुडुपात फेकण्यात आला होता. पेण तालुक्यातील फणसडोंगरी अंबिका नगर येथे राहणार्या बाळू सीताराम चुणारे यांचा चौदा वर्षीय मुलगा गणेश याची १० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली.
हत्येनंतर याचा मुलाचा मृतदेह आंबेडकर शाळा येथील झुडपात टाकून देण्यात आला होता. ही घटना आल्यानंतर गणेशच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची हत्या का? आणि कोणी केली? याबाबत अद्याप काही समजू शकलेले नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती बाळू चुणारे यांनी पेण पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पेण निरीक्षक संदीप बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रकरणी अज्ञात खुनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करीत आहेत.