सांगा आम्ही तरी कुठे? पालीतील चिमुरड्यांचा सवाल

By Raigad Times    13-Jan-2025
Total Views |
 pali
 
सुधागड -पाली | तीन वर्षापूर्वी लहानग्यांनी गजबजलेल्या पालीतील एकमेव बालोद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. सद्यस्थितीत हे बालोद्यान अखेरची घटका मोजत असल्याने अनेक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. संघर्ष ग्रुप आणि तत्कालीन पाली ग्रामपंचायतीमार्फत लहान मुलांची गरज ओळखून येथील राम आळीमध्ये हे बालोद्यान बनविण्यात होते.
 
त्यानंतर पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नगरपंचायतीवर प्रसासकांची नेमणूक झाली. दरम्यानच्या काळात उद्यानाकडे दुर्लक्ष झाले. मात्र नगरपंचायत होऊन अडीच ते तीन वर्षे झाली असुन वारंवार नगरपंचायतीकडे या बाल उद्यानाबाबत दुरुस्ती करण्यात यावी या साठी तक्रार करण्यात आली मात्र नगरपंचायत कडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली पाली ही नगरपंचायत झाली पालीकराऩा वाटले कि यावेळी या बलोद्यानाला नवी झळाळी येईल अशी अपेक्षा होती.
 
मात्र हे बालोद्यान जैसे थे च आहे. येथील पाळणे, सी-सॉ, गेट व बाकडे तुटले आहेत. तारेचे कुंपण अनेक ठिकाणी मोडले आहे. त्यामुळे येथे गुरांचे वास्तव्य असते. येथील झाडे व गवत कोमेजून गेली आहेत. दुरावस्था झाली आहे. आजूबाजूला वाहने पार्क केलेली असतात. परिणामी लहानग्यांना खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण नसल्याने त्यांचा प्रचंड हिरमोड होत आहे.
संघर्ष ग्रुप आणि तत्कालीन ग्रामपंचायतीने मिळून केलेल्या उद्यानाकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लहानग्यांना खेळण्यासाठी हक्काची जागा नाही. नगरपंचायतने उद्यानाची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करावी. याबाबत अनेक वेळा नगरपंचायतीकडे तक्रार देऊन नगरपंचायत अध्यापिक कोणता उपयोजना केलेल्या नाहीत. काही दिवसांनी हे उद्यान नाहीसे होईल व त्या जागेवर अतिक्रमण केले जाईल याची वाट नगरपंचायत पाहते का? - अमित निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाली