खोपोलीत दोन गटांत तुफान राडा , मौलना बदलण्यावरुन वाद

By Raigad Times    14-Jan-2025
Total Views |
 khopoli
 
खोपोली | मस्जिदमधील इमाम (मौलाना) बदलण्यावरुन झालेल्या वादातून खोपोलीत दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीतील मस्जिदमधील इमाम (मौलाना) बदलण्यासाठी मोहसिन शेख यांनी मागणी केली होती.
 
नईम मुखरी यांच्याकडून होत असल्याने हा वाद मिटविण्यासाठी रविवारी, १२ जानेवारी सायंकाळी ६ वाजता उद्योजक यशवंत साबळे यांनी महाराजा मंगल कार्यालयात बैठक बोलावली होती. मोहसिन शेख यांनी इमाम बदलण्यासाठी तू मला मदत कर, असे नईम मुखरी यांनी सांगितले.
 
त्यावेळी मुखरी यांनी मी मस्जिदचा ट्रस्टी नाही, असे म्हणाले. यावरुन वाद निर्माण झाला आणि शेख यांनी शिवीगाळी करुन, लाथा-बुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारुन दुखापत केल्याची तक्रार नईम मुखरी यांनी केली आहे. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
 
दरम्यान, मुस्लिम समाजात असलेल्या या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलीस तपास करत असताना उद्योजक यशवंत साबळे यांनी दोन्ही गटांना बोलावल्यामुळेदोन गटात राडा झाल्याने यशवंत साबळे यांनी कोणत्या अधिकाराने दोन्ही गटांना बोलावले होते? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून खोपोली परिसरात जोरदार चर्चा सुरु आहेत.