भरधाव कारने दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, महिला गंभीर

By Raigad Times    15-Jan-2025
Total Views |
 kalamboli
 
कळंबोली | भरधाव कार चालकाने दोघांना उडवल्याची घटना पडघे फाटा येथे घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी असून तिला कामोठे एमजीएममध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
टाटा नेक्झॉन कार चालक परविन रोशनलाल ग्रोवर (वय ५३ रा. कल्याण) हा मंगळवारी, १४ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या कल्याणकडून पनवेलकडे जात होता.
 
तो शिवजगृती हॉटेलसमोर आला असताना, लालू नारद तांटी वय २५ (रा.पडघे गाव, मूळ बिहार) आणि महिला प्रमिला दास (वय ३०) या पादचार्‍यांना त्याने धडक दिली. या अपघातात लालू तांटी याचा मृत्यू झाला तर प्रमिला दास या गंभीर जखमी झाल्या. त्यांना एमजीएम कमोठे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.