हटाळेेशर येथे तळीरामांचा त्रास, रहिवाशांचा संताप

By Raigad Times    17-Jan-2025
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली | पाली शहरातील हटाळेेशर चौक येथील सुख सागर सोसायटीच्या पायर्‍यांवर काही तळीराम रात्रीच्या वेळी दारू पीत असतात असतात आणि येथेच दारूच्या बाटल्या ठेवून निघून जातात. यापैकी काही तळीराम त्याच ठिकाणी दारू पिऊन झोपलेले आढळतात. या तळीरामांच्या हरकतांमुळे येथील लोकांना, विशेषतः दुकानदार व महिला-मुलांना, प्रचंड त्रास होत आहे.
 
पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या तळीरामांना या ठिकाणी बसू नका असे सांगितले तर अनेकदा वादविवाद व शिवीगाळ होत असल्याचे दिसून येते. शिवाय, ते उघड्यावरच लघुशंका करतात ज्यामुळे महिला व लहान मुलांना प्रचंड त्रास होतो.
 
यामुळे त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना जीव मुठीत धरून येथे येणे भाग पडते. रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने: दारूच्या दुकानात येणार्‍यांची वाहने मुख्य रस्त्यावरच अस्ताव्यस्त लावलेली असतात, ज्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडी होते. येथे छोटेमोठे अपघात तर नित्याचेच झाले आहेत. पोलिस मात्र, याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येते. वरीलप रिस्थितीमुळे पालीकर संतप्त झाले असून, प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची सोडवणूक करावी, अशी मागणी केली जात आहे.