घरात आईसह मुलाचा मृतदेह सापडला; कामोठेत खळबळ

By Raigad Times    02-Jan-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | पनवेल तालुक्यातील कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये बुधवारी, १ जानेवारी रोजी वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कामोठे वसाहतीमधील रूम नंबर १०४, ड्रीम हौसिंग सोसायटी, सरोवर हॉटेलच्या बाजूला, सेक्टर ६ ए, कामोठे येथील एका बंद रुममध्ये आई व मुलाचामृतदेह आढळून आला आहे.
 
यासंदर्भात दुपारी त्यांचे नातेवाईक घराचा दरवाजा ठोठावत असताना आतून दरवाजा उघडला न गेल्याने त्यांनी पोलीस कंट्रोल येथे तसे फायर ब्रिगेड येथे संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता गीता भूषण जग्गी, वय ७० वर्षे व मुलगा जितेंद्र भूषण जग्गी, वय ४५ वर्ष हे मृत अवस्थेत मिळून आले आहेत. याबाबत कामोठे पोलिसांनी अधिक तपास करीत आहेत.