पनवेल येथे हत्याराने डोयात केले वार, चौघांविरोधात गुन्हा

By Raigad Times    20-Jan-2025
Total Views |
 new mumbai
 
नवीन पनवेल | हत्याराने डोयात वार करून जखमी केल्या प्रकरणी अविनाश फडके, सलाम शेख, आकाश खंडागळे आणि एक अनोळखी इसमा विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंकज चव्हाण हे देवीचा पाडा येथे राहत असून नोव्हेंबर महिन्यात गावाकडील झालेल्या वादावरून त्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
 
१४ जानेवारी रोजी तो मोटरसायकल वरून पाले खुर्द येथे जाऊन पाण्याच्या टाकीजवळ उभा होता. यावेळी सलाम शेख याने त्याची कॉलर पकडली. त्यानंतर अविनाश फडके व त्याच्यासोबत एक अनोळखी इसम कारमधून खाली उतरला. फडके याने आमच्यावर केस करतो का असे बोलून आम्ही राजकुमार भाईची माणसे आहोत तुला मारेल, असे बोलून सलाम शेख याने त्याच्या चापट मारली आणि फडके व अनोळखी इसमाने हाता-बुयाने मारहाण केली.
 
त्यानंतर चव्हाण पुढे गेला असता आकाश खंडागळे हा तेथे आला व त्याने देखील त्यांना मारहाण केली. त्यानंतर पुन्हा तिघे त्या ठिकाणी कारने आले आणि हत्याराने डोयावर वार करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर ते तिथून पळून गेले.