तीन वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार

By Raigad Times    21-Jan-2025
Total Views |
 uran
 
उरण | उरणमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणार्‍या पन्नास वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी मोर सागरी पोलिसांनी सदर नराधमाला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
उरण मोरा फड येथील एक महिला कुटूंबासह राहते. १३ जानेवारी रोजी तिच्या तीन वर्षांच्या मुलीला ती घरात ठेवून कपडे धुण्यासाठी गेली. थोड्यावेळाने परत आल्यानंतर मुलगी घरात दिसली नाही म्हणून शेजारी राहणार्‍या दिनेश निवेतकर या याच्याकडे चौकशी केली. मुलगी गल्लीत खेळत असल्याचे निवेतकरने सांगितले.
 
त्यामुळे सदर महिलेने मुलीला शोधण्यासाठी गल्लीत गेली; मात्र तिथे ती आढळून आली नाही. घराजवळील शौचालयाशेजारी ती आढळून आली. आईला बघून ती चिमुरडी बिलगून रडू लागली. त्यानंतर मुलीला ताप भरला. तो उतरत नसल्याने तिला डॉक्टरकडे नेण्यात आले.
 
तिी नीट चौकशी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. या प्रकारानंतर तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने थेट मोरा सागरी पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. यानंतर पोलिसांनी निवेतकर याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात पोक्सो अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मोरा सागरी पोलीस करीत आहेत.