माणगाव | निजामपूर तळेआळी येथील नागरिकांनी सामाजिक सभागृहाची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून शासनाच्या पर्यटन विकास मंडळाच्या निधीतून १५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन रोजगार हमी योजना, फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री ना. भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी ना. गोगावले म्हणाले कि या सामाजिक सभागृहाला लागणारा उर्वरित कामासाठीचा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. निजामपूर तळेआळी येथील सभागृहाचे उद्घाटन मंत्री ना. भरत गोगावले यांच्या हस्ते १९ जानेवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे, युवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे, शिवसेना समन्वयक नितीन पवार, युवासेना सचिव अच्चुत तोंडलेकर, युवासेना तालुकाप्रमुख राजेश कदम, युवासेना तालुका संपर्क प्रमुख संतोष पोळेकर, निजामपूर विभाग प्रमुख मनोज सावंत, माजी विभाग प्रमुख गणेश समेळ, यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ब्राम्हण समाज, निजामपूर ग्रामपंचायत, व तळेआळी ग्रामस्थांच्या वतीने मंत्री ना. भरत गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.