मुंबई | नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. एप्रिल २०२५ अखेरीस देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या विमानसेवा सुरु होणार आहे. मार्च २०२५ अखेरीस देशांतर्गत वाहतूक सुरु होणार तर एप्रिला २०२५ अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना जलद गतीने नवी मुंबई विमानतळावर पोहचता यावे, यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय निर्माण केले जात आहेत.
त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वॉटर टॅक्सीचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार मुंबईच्या कोणत्याही कानाकोपर्यातून फक्त १७ मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील एकमेव विमानतळ आहे.
या विमातळावर वाहतुकीचा मोठा ताण येत आहे. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईच्या विमानतलावरीव ताण कमी होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील दुसर्या क्रमाकांचे मोठे विमानतळ ठरणार आहे.या विमानतळाचा रनवे ३.७ किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी ३५० विमाने उभी राहू शकतात. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला ९ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात.
नवी मुंबई विमातळापर्यंत पोहचण्यासाठी रेल्वे, भुयारी मेट्रो, अटल सेतू, एक्स्प्रेस वे यासारखे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रवाशांना जलद गतीने नवी मुंबई विमानतळावर पोहचता यावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वॉटर टॅक्सीचा प्रस्ताव मांडला आहे.
वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून मुंबईच्या कोणत्याही कानाकोपर्यातून फक्त १७ मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येईल, असे गडकरी म्हणाले. मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सरकारने वॉटर टॅक्सीची योजना तयार केली आहे. या योजनेंतगर्त नवी मुंबई विमानतळाजवळ नेरुळ, बेलापूर तसेच उरण परिसरात जेट्टी बांधण्यात आला आहे. मुंबईतून वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून अगदी जलद गतीने नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे.