पेण | तालुयातील खारेपाट भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ दरम्याच्या आमरण उपोषण आंदोलनानंतर ७६७ कोटीची मंजरिीं मिळूनही खारेपाटातील हेटवणे कालव्याचे काम अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे खारेपाटला हक्काचे पाणी कधी मिळणार? असा सवाल करत, पेण विकास संकल्प संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन १५ ऑक्टोबर २०२४ रोजी निविदा उघडण्यात आली. त्यानंतर ३ महिने उलटूनही कालव्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश झाले नाहीत. कार्यारंभ आदेश होऊन कालव्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी १९ डिसेंबर २०२४ रोजीचे प्रांताधिकारी पेण यांचे दालनासमोर होणारे लक्षवेधी सत्याग्रह ठिय्या आंदोलन स्थगित केलेले होते व आंदोलन स्थगित करतांना एक महिन्यात कार्यारंभ आदेश होवून काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर एक महिना होऊनही कार्यारंभ आदेश न झाल्याने सदरचे २५ जानेवारीपासून तहसिलदार पेण यांचे दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पेण खारेपाट विकास संकल्प संघटना, २४ गाव संघर्ष समिती, गेल पाइपलाइन विरोधी संघर्ष समिती, एम.एम.आर.डी.ए. विरोधी भुमीपुत्र संघर्ष समिती व खारेपाटातील सर्व शेतकरी यांनी २५ जानेवारी २०२५ पासून पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
आता ह्या आंदोलनाच्या पोर्शभूमीवर देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधीपासून सुरू होणार्या आंदोलनामुळे पुन्हा खारेपाटातीलपाणी प्रश्न चिघळण्याची शयता निर्माण झाली आहे. सिडकोची पाईपलाईन २००२ साली पूर्ण होते व पुन्हा जलबोगद्याच्या कामाससुद्धा मंजुरी मिळून काम सुरू होते; परंतु कष्टकरी शेतकर्यांसाठी हेटवणे धरण बांधले आहे, त्यांना मात्र अजूनही हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
त्यामुळे सरकार ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांत दुजाभावकरत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. कार्यारंभ आदेश होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी, सचिव सी आर म्हात्रे, राजेंद्र झेमसे, प्रितेश माळी, महेंद्र ठाकूर, अजित पाटील, तसेच खारेपाट ग्रामस्थ यांनी दिला आहे.