शार्लोट लेकच्या संवर्धन कामाला सुरुवात , पाच कोटींचा निधी ; जीवन प्राधिकरणकडून निधीची तरतूद

By Raigad Times    25-Jan-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | माथेरान शहरातील पाण्याचा साठवण तलाव गाळाने भरला आहे. २०१४ नंतर शार्लोट लेकमधील गाळ काढण्यात आला नाही. जून २०२४ मध्ये माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेने उपोषण केले होते आणि त्यावेळी पावसाळ्यानंतर शार्लोट लेक तलावातील गाळ काढण्याचे ओशासन माथेरान नगरपरिषदेने दिले होते. दरम्यान, नवीन वर्षात माथेरानमधील शार्लोट लेक तलावातील गाळ काढण्याचे कामाला सुरुवात झाली आहे.
 
माथेरानमध्ये ब्रिटिशांनी शार्लोट लेक हा तलाव खोदला आणि पाणी साठवून ठेवण्याचे काम केले. ब्रिटिशांनी बांधलेल्या शार्लोट लेकची साफसफाई माथेरान नगरपरिषदेकडून मागील काही वर्षे करण्यात आली नाही. पिण्याच्या पाण्याचे दृष्टीने माथेरान शहरातील हा शार्लोट लेक महत्वाचा आहे. दरवर्षी पावसाळा सुरु होण्यासाठी माथेरान नगरपरिषदेकडून तलावातील कचरा उचलण्याचे काम सफाई कामगार यांच्याकडून करून घेतले जाते.
 
२०१४ मध्ये नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठानकडून हजारो श्री सदस्य यांच्या माध्यमातून शार्लोट लेकची साफसफाई करण्यात आली होती. त्यानंतर पुढे दहा वर्षेचा कालावधी लोटला आहे. मात्र नगरपालिकेने या तलावाची स्वच्छता केलेली नाही. दोन वर्षांपूर्वी तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने आडकाठी केल्यानंतर ऐन पावसाळ्यात शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम रद्द झाले होते.
 
त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तलावातील गाळ काढणायची मागणी लावून धरली होती. आता माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेने शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी माथेरान नगरपरिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना एक डेडलाईन दिली होती. त्या काळात माथेरान नगरपरिषदेने शार्लोट लेक तलावातील गाळ काढण्याचे काम केले नाही आणि त्यामुळे माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेने उपोषण सुरु केले होते.
 
निसर्ग पर्यटन संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष संजय शिंदे, सचिव, अविनाश गोरे, खजिनदार जगदीश कदम यांनी सुरु केलेल्या उपोषणांनंतर माथेरान प्लिकेने शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे तसेच संवर्धन कामाची निविदा निघाली आहे, त्यामुळे निविदेतील १८ महिन्यांचे कालावधीत तलावातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढेल, असे ओशासन दिले होते.
 
त्यानंतर सहा महिने लोटले तरी शार्लो ट लेकमधील गाळ काढण्याचे काम सुरु होत नव्हते. त्यामुळे उपोषण सोडविण्यासाठी माथेरान नगरपरिषदेने उपोषणकर्त्यांची फसवणूक केली असल्याची भावना समोर आल्या होत्या. मात्र मागील काही दिवसांपासून माथेरान पालिकेने ठेका दिलेल्या ठेकेदाराने शार्लोट लेकच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात केली आहे.
आम्हाला नगरपरिषदेने निविदा कागद दाखवले होते आणि त्यावर विेशास ठेवून उपोषण मागे घेतले होते. त्या काळात निवडणुका आल्याने प्रतीक्षा कामाचे कार्यादेश उशिरा मिळाले आहेत. त्यामुळे उशिरा का होईना कामाला सुरुवात झाली असल्याने आम्ही समाधानी आहोत. मात्र पावसाळा सुरु होण्याआधी लेकमधील सर्व गाळ काढून झाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी राहणार आहे. - संतोष कदम, उपोषणकर्ते
शासनाने शार्लोट लेकचे काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यात धरणाच्या जलाशयाबाहेरील गाळ पुन्हा येऊ नये यासाठी बंदिस्ती बांधल्यास त्याच ठिकाणी माती गाळ थोपवून ठेवता येणार आहे. त्याचवेळी झाडे असलेल्या ठिकाणी पर्यटन वाढविणेसाठी काही उपक्रम राबविता येऊ शकतो याचा विचार नगरपरिषदेने करावा. -जनार्दन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते