अलिबाग | कोणीही यावे आणि जाहिरात फलक लावून जावे, अशी गत प्रत्येक शहरात आणि निमशहरात पहायला मिळते. बेकायदा बॅनरमुळे बकालीकरण होतेच; परंतू अलिकडे अपघातदेखील होण्याचे प्रकार वाढले आहेत. याची दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाने संबंधीत स्थानिक संस्थांना बॅनर हटविण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायतींची धावाधाव सुरु आहे. अनेक नगरपरिषद, ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनधिकृत आकाश चिन्हे, होर्डींग्ज, पोस्टर्स, कमानी आदीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपंचायत कर्मचारी आपल्या हद्दीतील बेकायदा जाहिरात फलक काढण्यात गुंतले आहेत.
खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनीही नगरपरिषदेची रितसर परवानगी घेऊनच जाहिरात होर्डिंग, बॅनर लावावेत असे आवाहन केले आहे