पेण येथील रुग्णांना मुंबईत जाण्याची गरज नाही- खा.तटकरे

By Raigad Times    25-Jan-2025
Total Views |
 pen
 
पेण | पेण शहरात सर्वसोयीनिशी सुसज्य अशा गॅलेसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
 
उपचारासाठी आपल्याला मुंबईतील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला लागत होते परंतु आता पेणमधील नव्या जागेत झालेल्या गॅलेसी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक उपकरणाने सुसज्ज असे हॉस्पिटल असल्याने उपचारासाठी मुंबई जाण्याची गरज न भासता मुंबईतील रुग्ण उपचारासाठी गॅलेसी हॉस्पिटलमध्ये येतील अशी सुसज्य व्यवस्था इथे आहे हॉस्पिटलचे नाव शासनाच्या आरोग्य विषयी योजनांच्या यादीत येण्यासाठी ही पुढील काळात पाहिले जाईल असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
 
यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत भाजपा उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी आ. युवा नेते अनिकेत तटकरे, वेदांती तटकरे, मिलिंद पाटील, हॉस्पिटलचे मालक संचालक डॉटर रत्नदीप गवळी, आदि मान्यवर उपस्थित होते.