लोणेरे | माणगाव तालुयातील भुवन गाव स्वप्नातील गाव म्हणून प्रमाणित करण्यात आले. गाव विकास समिती, तरुण मंडळ, महिला मंडळ, शाळा कॉलेज चे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनीच आजचा हा सोहळा लेझिम, ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला.
भुवन गावच्या विकासासाठी गावकरी, स्वदेस आणि शासन यांच्या यांच्या सहकार्याने गाव विकास आराखडा निकष (स्वच्छ, स्वास्थ, सुंदर, साक्षर, समृद्ध) पूर्ण करीत आपले गाव ७५ टक्के टप्पा गाठून कसे स्वप्नातील गाव बनले याचा प्रवास प्रस्तविकेद्वरा करण्यात आले. गावचा विकास करण्यासाठी स्वदेश फाउंडेशन मार्फत पाणी योजना, शौचालय, घरोघरी सोलर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, स्कॉलरशिप, तसेच आर्थिक प्रकल्प यावरती ५९ लाख रु निधी खर्च करण्यात आला.
तसेच शासनामार्फत विविध पायभूत सुविधांसाठी ५५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आणि त्याचबरोबर आपल्या गावच्या विकासाची गावकर्यांनी स्वतः विविध माध्यमातून २८ लाख रु उपलब्ध करून गावचा विकास घडवून आणला. या कार्यक्रमासाठी स्वदेस फाउंडेशन वरिष्ठ व्यवस्थापक नजरुद्दिन शिकलगार व्यवस्थापक शीतल सूर्यवंशी आणि स्वदेस टीम तसेच इंदापूर विभागातील इतर समिती सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.