रायगड पालकमंत्रीपदाच्या वादावरुन भाजप आमदाराच्या शिवसेना, राष्ट्रवादीला कानपिचक्या

By Raigad Times    29-Jan-2025
Total Views |
 mhad
 
महाड | पालकमंत्रीपद म्हणजे काय जीवन मरणाचा प्रश्न नाही, पालकमंत्री पदावरुन अशाप्रकारे भांडत राहिल्यास जनतेला ते आवडणार नाही, अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांचे शिलेदार, भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी शिवसेना-राष्ट्रवादीला दिल्या आहेत.
 
रायगडच्या पालकमंत्री पदावरुन गेले अनेक दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपलेली आहे. यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांमधून वादग्रस्त वक्तव्य येत आहेत. शिवसेना-राष्ट्रवादीत हा वाद सुरु असताना भाजपने दोन्ही पक्षांना फटकारले आहे. पालकमंत्रीपदासाठी रस्त्यावर उतरणे अशोभनीय आहे.
 
जनतेने राज्याच्या विकासाठी महायुतीला जनाधार दिला आहे. आपले म्हणणे पक्षाच्या किंवा महायुतीच्या चौकटीत राहून मांडता येऊ शकते. यासाठी हमरीतुमरीवर येण्याची गरज नसल्याचे आ.प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.