नव्या वर्षात मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे दोन निर्णय

By Raigad Times    03-Jan-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची नव्या वर्षातील पहिली मंत्रिमंडळ बैठक गुरुवारी, २ जानेवारी रोजी पार पडली. खातेवाटप होऊन आठवडा झाल्यानंतरही काही मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नसल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी १२ वाजता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबै बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली.
 
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम-२२० मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीतसुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग) शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली.