सुधागड-पाली | महाराष्ट्रातील अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील बल्लाळेेशर देवस्थानचा माघी गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर आला आहे. हा उत्सव ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक बल्लाळेेशराच्या दर्शनासाठी पालीत येतात. या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
पालीतील स्थानिक प्रशासनाने आणि बल्लाळेेशर देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था केल्या आहेत. यात्रेच्या पोर्शभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलीस विभागाने यात्रा स्थळी चोख बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था केली आहे.यावर्षीच्या गणेशोत्सवात भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि भजने आयोजित केली जातील.
यात्रेत गोड खाऊ आणि हॉटेल्सच्या स्टॉल्सची रेलचेल असेल. तसेच, लहान मुलांसाठी खेळणी आणि पाळण्यांचे स्टॉल्सही असतील. यात्रेत सहभागी होणार्या गोरगरीब आणि स्थानिक दुकानदारांसाठी ही एक मोठी संधी आहे. बल्लाळेेशरच्या माघी गणेशोत्सवाची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग आणि बल्लाळेेशर देवस्थान ट्रस्ट यांच्या समन्वयाने काम करीत आहेत.