माणगाव केंद्राच्या शिक्षकांनी केला घर घर संविधानचा निर्धार

By Raigad Times    31-Jan-2025
Total Views |
 mangoan
 
माणगाव | संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या ‘घर घर संविधान’ या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी माणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्या संकल्पनेनुसार नाविन्यपूर्ण पद्धतीने माणगाव तालुयातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये करण्यात येत आहे.
 
बुधवारी, २९ जानेवारी रोजी माणगाव तालुयातील उतेखोल या केंद्राच्या जानेवारी महिन्यातील शिक्षण परिषदेमध्ये केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संविधान अभ्यासक नुरखाँ पठाण यांचे केंद्रातील सर्व शिक्षकांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यासोबतच दिपाली तांडेल साधन व्यक्ती यांनी सर्व समावेशित शिक्षण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
 
संतोष बेंडुगडे साधन व्यक्ती यांनी पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. पूर्वा येलवे शाळा विकास कॉलनी यांनी इंग्रजी संवाद कौशल्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उतेखोल केंद्रातील सर्व शिक्षकांनी केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वयंप्रेरणेने ‘घर घर संविधान’ हा उपक्रम आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी करण्यासंदर्भात निर्धार केला.