खालापूर पाताळगंगा एमआयडीसीतील फार्मा कंपनीमध्ये भीषण आग

By Raigad Times    06-Jan-2025
Total Views |
 KHALAPUR
 
खालापूर | खालापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील एका फार्मा कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीनंतर या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.
 
या फार्मा कंपनीत कॉस्मेटिक तयार करण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल आणि औषधांचे रॉ मटेरिअल बनवले जात होते. मात्र याआगीत कंपनीतील जवळपास सर्वच सामान जळून खाक झाल्याचे समजते. खालापूर तहसीलदार चव्हाण यांच्या सूचनेनुसार नायब तहसीलदार सुधाकर राठोड आणि मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडेकर घटनास्थळी पोहोचले आहेत.
 
रसायनी पोलीस यांचे पथकदेखील घटनास्थळी पोहचले होते. पाताळगंगा एमआयडीसीतील एसपीआर कंपनीत अचानक आग लागल्यानंतर आग लागल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. खोपोली नगरपालिका, पाताळगंगा एमआयडीसी, रिलायन्स आणि पनवेल महानगरपालिका फायर ब्रिगेडने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केले.