कोलाड | रोहा तालुयातील रायगड जिल्हा परिषद शाळा धानकान्हे आदिवासी वाडी येथील विद्यार्थ्यांना लायन अलंकार खांडेकर यांच्या सौजन्याने व कोलाड लायन्स लबच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले.
कोलाड विभाग परिसरात गेली चार वर्षे ग्रामीण भागात ही सेवाभावी संस्था विविध उपक्रम राबवत असून लायन्स लब ऑफ इंटनॅशनल डिस्ट्रिटच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, तसेच गरीब गरजू व्यक्तींना डोळे तपासणी शिबीर आयोजित करत त्यांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी देत विविध प्रकारची मदत करत आहेत.
तसेच तेथील दुर्लभ समाज घटकाला आरोग्यसेवा तसेच काही विविध उपक्रम राबवत असतात. यावेळी लायन्स लबचे उपाध्यक्ष डॉ श्याम लोखंडे, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे, खजिनदार राजेंदर कप्पु, माजी खजिनदार तथा बोर्ड ऑफ डायरेटर नंकुमार कळमकर, लायन दिलिप मोहिते, पुगाव केंद्र प्रमुख वैशाली सलागरे, शाळेचे मुख्याध्यापक मारोतराव कोरडे, शिक्षिका शोभा खांडेकर, सामाजिक कार्यकर्तेपांडुरंग गोसावी, महादेव जाधव, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संजना जाधव, पालक प्रणिता जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.