रायगडात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे वाढले , समाजाला अंतर्मुख करणार्‍या घटना

By Raigad Times    08-Jan-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | महिला विशेषत: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबतचे कायदे कडक करण्यात आलेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यास गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी अत्याचाराचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १०७ बलात्काराच्या घटना समोर आल्या.
 
यातील ७४ प्रकरणे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची असल्याची बाब समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात सन २०१९- २० पर्यंत महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे सरासरी वार्षिक ५० गुन्हे दाखल होत होते. गेल्या तीन वर्षात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.
 
यात बालकांचे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. २०२४ मध्ये रायगड पोलीस दलाच्या बलात्काराची १०७ प्रकरणे, विनयभंगाची १५७ प्रकरणे दाखल झाली. बलात्काराची १०७ पैकी ७४ गुन्हे हे पॉस्को कायद्यांतर्गतचे आहेत. म्हणजेच ही सर्व प्रकरणे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराशी निगडीत आहेत. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हा गंभीर विषय आहे. याबाबत कोणती ठोस पावले उचला येतील यासाठी, गृह विभाग आणि महिला आयोग यांच्याशी चर्चा लागेल किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्याबाबत प्रयत्न करता येऊ शकतील.
पूर्वी बदनामी होईल या भितीने पिडीत मुलगी अथवा तिचे पालक तक्रारीसाठी समोर येत नस. आता पिडीत मुली आणि तीचे पालक तक्रारीसाठी समोर येऊ लागले आहे. पोलीस अशा गुन्ह्याबाबत अतिशय संवेदनशील आहेत. वर्षभरात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आम्ही न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केली आहेत. - सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, रायगड