पनवेल येथे झाडावर आदळून दुचाकीचालकाचा मृत्यू

By Raigad Times    09-Jan-2025
Total Views |
 panvel
 
नवीन पनवेल | रस्त्यावर भरधाव वेगात दुचाकी चालवताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याकडेच्या आंब्याच्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण लाला बोरसे (२४) असे त्याचे नाव असून तो पनवेलमधील विहिघर येथे राहत होता.
 
खांदेेशर पोलिसांनी या अपघाताला मृत तरुणाला जबाबदार धरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरण हा २८ डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी त्याच्या पनवेल-माथेरान दुचाकीने पनवेल- माथेरान रोडने आपल्या घरी जात होता. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने किरणची दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर जाऊन आदळली.
 
या अपघातात किरण गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्याच मृत्यू झाला. याप्रकरणी खांदेेशर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून या अपघाताचा तपास केला असता किरण याने भरधाव वेगात मोटारसायकल चालवल्याने हा अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.