खोपोली | पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून हत्या केल्याची घटना खोपोली शहरातील लौजी परिसरात घडली शितल गणेश घोडके असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी तिच्या नवर्याला ताब्यात घेतले आहे. गणेश दादासाहेब घोडके मूळ गाव घालशिळ, पारगाव जि.बीड हा पत्नी शितल सोबत खोपोलीतील सुखकर्ता अपार्टमेट लौजी (चिंचवली शेकीन) येथे गेल्या पाच महिण्यांपासून राहत होते. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाला.
या गणेशने पत्नी शितलची ओढणीने गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह अंथरुणामध्ये गुंडाळून त्यावर कपड्यांचा ढिग रचला आणि बाथरुममध्ये बंद करून ठेवला. याची माहिती मित्र आशुतोष देशमुख याला मिळाली असता.तो गणेशच्या घरी पोहचला. मात्र त्याला शीतल मृतावस्थेत आढळून आला. आशुतोष याने गणेशला फोन केला व शीतलला हॉस्पिटल घेऊन जाऊ सांगितले. परंतु गणेश फोन बंद करुन पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी गणेश घोडके याच्या गाडी नंबरवरुन तपासाचे चक्र फिरवले असता गणेश उर्से टोल नाक्यावरुन जात असल्याची माहिती मिळताच खोपोली पोलिसांच्या टिमने पाठलाग केला. गणेश पोलिसांना शिवापूर टोलनाक्यावरही चकवा दिला. पोलिसांनी गणेशला सातारा आणेवाडी टोलनाक्यावर अटक केली आहे. या घटनेचा खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे पुढील तपास करीत आहेत.