कर्जत तालुका आरपीआय (आठवले) कार्यकारिणी बरखास्त

By Raigad Times    01-Feb-2025
Total Views |
 KARJT
 
वावोशी | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदासह संपूर्ण तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. आठवले रिपाईचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले असून, सद्यस्थितीत कार्यरत असलेले कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला पदमुक्त करण्यात आले आहे.
  
पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्रमुख अ‍ॅड. बी. के. बर्वे लवकरच रायगड जिल्हाध्यक्षांना पुढील निवडणुकीचा कार्यक्रम देणार असून त्यानंतरच कर्जत तालुका अध्यक्षपदाची निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे व नव्या कर्जत तालुका अध्यक्षाची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले आहे.