नागोठणे | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कानसई-नागोठणे ते डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीत ४००/२२० के.व्ही. ही उच्च वीज दाब वाहिनी टाकण्याच्या कामात जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासन व संबधित ठेकेदार कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे या उच्च वीज दाब वाहिनी विरोधात खारकोलेटी येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
याप्रकरणी शेतकर्यांनी जनशक्ती संघर्ष समिती स्थापन केली असून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या विरोधात संघर्ष समितीने खा. सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले. याप्रकरणी योग्य ती दखल घेतली जाईल, असे ओशासनही खा. सुनील तटकरे यांनी संघर्ष समितीला दिले आहे. ज्या शेतकर्यांच्या जागेतून ही उच्च दाबाची वीज वाहिनी जाणार आहे, त्या जागेत संबंधित शेतकर्यांना भातशेती करता येणार नाही.
जमिनीवरून जाणार्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीमुळे अशी जमीन भविष्यात कुणीही विकत घेणार नाही अथवा शेतकरी या जागेचा विकासही करु शकणार नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल होणार आहेत. त्यामुळेच जेएसडब्ल्यू व ठेकेदार कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात कोलेटी, खारकोलेटी येथील या उच्च दाब वीज वाहिनीमुळे बाधित होणारे सुमारे २० संबंधित शेतकरी आक्रमक झाले आहेत.
त्यानुसार शेतकर्यांच्या या जनशक्ती संघर्ष समितीने दि. ७ फेब्रुवारी खासदार सुनील तटकरे यांची नागोठण्यात राष्ट्रवादीचे नेते भाई टके यांच्या निवासस्थानाजवळ भेट घेऊन आपले गार्हाणे त्यांच्यासमोर मांडले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते भाई टके, जनशक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी, उपाध्यक्ष हेमंत भोईर, सचिव मधुकर ठाकूर, संघर्ष समितीचे सदस्य चंद्रकांत ठाकूर, जनार्दन भोईर, तानाजी भोईर, दयाराम पाटील आदींसह बाधित होणारे शेतकरी यावेळी उपस्थित होते. जेएसडब्ल्यू कंपनीच्या या ३० किलोमीटर लांबीच्या वीज वाहिनीचे सर्वेक्षण करताना शेतकर्यांना विेशासात घेतले नाही.
या उच्च दाब वीज वाहिनीच्या खालील शेतजमीन तसेच वीज वाहिनीपासून दोन्ही बाजूकडील शेत जमीन मोठ्या प्रमाणात बाधित होऊन शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम व वीज वाहिन्या टाकण्याचे काम जेएसडब्ल्यू कंपनीने बी.एन.सी. पॉवर प्रोजेट लिमिटेड या दुसर्या एका खासगी कंत्राटदार कंपनीला दिले आहे. या खाजगी कंत्राटदाराने काही मोजयाच स्थानिकांना हाताशी धरुन शेतकर्यांच्या शेतातून ही उच्च दाब वीजवाहिनी जाणार आहे त्या शेतकर्यांना विेशासात न घेतल्याने शेतकर्यांत संतापाची लाट उसळली असून या प्रकाराला वेगळे वळण लागण्याची शयता नाकारता येत नाही.
दरम्यान जेएसडब्ल्यू कंपनी एकीकडे पेण तालुयातील शेतकर्यांच्या शेतजमिनी एकरी करोडो रुपये किमतीने विकत घेत असतानाच दुसरीकडे आम्हाला कोणतीही नोटीस व सूचना न देता आमच्या संमतीशिवाय उच्च दाबाच्या विज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू असल्याने एकतर आमची जमीन शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसारच्या दराने सरसकट संपादित करावी अथवा बाधित शेतकर्याच्या एक वारसाला कंपनीत नोकरी द्यावी अशी मागणीही बाधित शेतकर्यांमधून होत आहे.
शेतकर्यांच्या संमतीशिवाय शेतात मुख्य ठेकेदार असलेल्या बी.एन.सी. पॉवर प्रोजेट लि. यांच्याकडून देण्यात आलेल्या एका खाजगी कंत्राटदाराकडून शेतजमिनीवर मनोरे तसेच वीज वाहिन्या टाकण्याचे काम आहे. शेतकरी बांधवांच्या शेतजमिनीवरून जाणार्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या या उच्च दाबाच्या वीज वाहिनीमुळे आमची शेतजमीन भविष्यात कवडीमोल होईलच तसेच कुणीही विकत घेणार नाही आणि आम्ही शेतकरी अशी जागा कोणत्याही प्रकारे विकसित देखील करु शकणार नाही. त्यामुळे आम्हा शेतकर्यांचा भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी जनशक्ती संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयांवर लवकरच धडक देणार आहोत. - प्रभाकर डाकी, अध्यक्ष, जनशक्ती संघर्ष समिती