अलिबाग | राज्यात बारावीच्या परिक्षा आजपासून (११ फेब्रुवारी) सुरु होत आहेत. रायगड जिल्ह्यात या परीक्षेकरिता ५० परीक्षा केंद्रांवर ३१ हजार ८१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा व गैरमार्ग प्रकरणास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास, गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणार्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
आपला पेपर चांगला जाणार आहेच, हा सकारात्मक विचार करा व नकारात्मक विचार करा, असे आवाहन परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने केले आहे.