भारतीय संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी तरुण-तरुणींनी अर्ज करा

By Raigad Times    12-Feb-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्त संख्येने यावे यासाठी राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली असून रायगड जिल्ह्यामधील युवक, युवतीनी या संकेतस्थळावर २८ फेब्रुवारी २०२५ पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) यांनी केले आहे.
 
महाराष्ट्राचे अधिवासी अधिवासी प्रमाणपत्र, जन्म तारीख २ जानेवारी २०११ ते १ जानेवारी च्या दरम्यान, मार्च, एप्रिल, मे २०२५ मध्ये होणार्‍या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला व जून २०२५ इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावे. इच्छुकांनी www.spiaurangabad. com या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत.