म्हसळा | तालुयातील मोठ्या लोकवस्तीच्या गोंडघर आणि खारगाव बुद्रुक येथील श्री विेशकर्मा सुतार समाज संघटना, म्हसळा यांनी विेशकर्मा जयंती उत्सवाचे आयोजन करून सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पाडले. आयोजित कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा म्हसळा तालुका सुतार समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वागत कार्यक्रमात मंत्री अदिती तटकरे यांनी सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा देताना सामाजिक कार्यक्रम पार पाडत असताना समाज परंपरा व संस्कृती जोपासत ठेवत ती कायमस्वरुपी कार्यान्वयीत ठेवावी, असे सूचित केले. निवडणूक कालावधीत सुतार समाजाने खासदार सुनील तटकरे आणि मला चांगली साथ व सहकार्य केले आहे.
आमच्या माध्यमातून समाजमंदिर, संरक्षण भिंत आणि परिसर सुशोभीकरण करण्याचे काम करण्यात आले आहे. नव्याने मंदिर दुरूस्ती व सामाजिक सभागृह बांधकामाला आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे ओशासन दिले. सरपंच अनंत नाक्ती यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यांचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला मंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत गट विकास अधिकारी माधव जाधव, स.पो. नि.संदीप कहाळे, ओएसडी शहाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.