इलेट्रीक वायर, साहित्य चोरणार्‍या टोळीला पनवेल पोलिसांनी केले गजाआड

By Raigad Times    13-Feb-2025
Total Views |
panvel
 
पनवेल | पनवेल तालुयातील वारदोली येथील वाधवा वाईस सिटी मॅगनोलिया बिल्डींग परिसरात ठेवलेल्या लाखो रुपये किंमतीच्या इलेट्रॉनिस वायर व इतर साहित्य चोरी केल्याप्रकरणी अवघ्या २४ तासांत पनवेल तालुका पोलिसांनी चौकडीला गुन्ह्यातील गाडीसह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे.
 
सदर गुन्ह्यातील येथील सुपरवायझर याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस हवालदार देवरे, कुदळे, धुमाळ, तांडेल, बाबर, पोलीस शिपाई सोनकांबळे, खताळ, भगत आदींच्या पथकाने सदर गुन्ह्यातील चोरांचा तांत्रिक तपास तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध सुरू केला.
 
तपासात मो. राशिद मो. नाझीम फारूकी (३२), मो. साहीद अजगर आली (२१), मो. आसिफ मो. रेहमान (२४), मो. इम्रान शफीक अहमद फारुकी (४३) सर्व राहणार धारावी यांची माहिती मिळाली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या गाडी नं. एमएच ४३ एटी ३९१९ जिची किंमत ३ लाख रुपये इतकी आहे व त्या गाडीच्या आधारे सदर ठिकाणी येवून त्यांनी इलेट्रिक वायर व साहित्य पैकी ३ लाख १७ हजार २२० रुपये किमतीचा व मोबाईल फोन २० हजार किमंतीचे असा एकूण ६ लाख ३७ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या चौकडीला ताब्यात घेत गुन्ह्यातील मुद्देमाल व वापरलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सदर चौकडीने यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचे काही गुन्हे केलेले आहेत का? याचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.