धक्कादायक! मुलीवर अत्याचार करणारा नराधम बाप अटकेत

By Raigad Times    13-Feb-2025
Total Views |
 new mumbai
 
नवीन पनवेल | बापानेच मुलीवर अत्याचार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे. याप्रकरणी नराधम बापाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी नराधम बापाला अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
 
१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नराधम बापाने शरीरसंबंध प्रस्थापित करत तिच्यावर अत्याचार केला. तिला शंभर रुपये देऊन प्रकार कुठे सांगू नको? असे सांगितले. यावेळी रात्री सगळे झोपलेले होते. सकाळी या पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला.
 
मात्र बाप असल्याने याबाबत कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी पीडित मुलीला घेऊन तिच्या आईने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठले आणि त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल शहर पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांजुरणे करत आहेत.