माणगाव | उतेखोल येथील आश्रमशाळेलगत असलेल्या डंम्पिंग ग्रांऊडला आग लावण्यात येत असल्यामुळे माणगावकरांचा श्वास कोंडतो आहे. शेजारी असलेल्या वनवासी आश्रमशाळेतील शालेय विद्यार्थ्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेचा कचरा शहरातील उत्तेखोल येथील एका मैदानात टाकले जाते.
नागरिक रात्री साखर झोपेत असतानाच या कचर्याला आग लावली जाते. त्यामुळे मोठ्याप्रमाणत धुर होऊन विषारी वायू नागरिकांच्या घरात पसरतो. शेजारीच वनवासी आश्रमशाळा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होतो. शाळेतील विद्यार्थी आजारी पडणार्यांचीही संख्या मोठी असते. प्रस्तुत प्रतिनिधीने ही बाब नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली असता, नगरपंचायत सुपरवायझर मोरे व शहर समन्वयक अतुल जाधव यांना आग नियंत्रणात आणण्यासाठी सुचना दिल्या असल्याचे सांगितले.
माणगांव नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रकाश मोरे व सारंग कणोजे यांना कळवल्यानंतर कर्मचार्यांच्या मतदतीने काही तात्पूरती विझविण्यात आली आहे. काही वर्षांपासून माणगांव शहरातील लोक वसाहतीमधुन निर्माण होणारा हजारो टन कचरा उतेखोल येथील आश्रमशाळेजवळ मोकळ्या मैदानात डम्प केला जात आहे.
याचा सर्वाधिक त्रास येथील आश्रमशाळेतील लहान शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, मुख्याधिकारी संतोष माळी यांनी समस्येची गंभीर दखल घेऊन यावर ठोस उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यापुढे तेथे कचरा टाकणे बंद करुनच घनकचरा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.