विमा आता १०० रुपयांत? पीकविम्याची फेररचना होणार?

By Raigad Times    15-Feb-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | शेतकर्‍यांच्या पीकविम्याच्या रकमेत लवकरच वाढ होणार आहे. एका रुपयात मिळणारा पिक विमा आता १०० रुपयांत काढावा लागणार आहे. त्यासाठी लवकरच पीकविम्याच्या नियमात बदल करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना मिळणारा एका रुपयातील पीकविमा आता बंद होणार असल्याची माहिती आहे.
 
एका रुपयांत मिळणार्‍या पीकविम्यासाठी आता शेतकर्‍यांना १०० रुपये मोजावे लागणार आहे. कारण पुढील काही दिवसांत पीकविमा योजनेची फेररचना होणार आहे. तसा प्रस्तावच कृषी विभागाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. लवकरच सरकार पीकविम्याच्या नव्या प्रस्तावावर निर्णय घेणार आहे. पीकविम्याच्या नियमात सरकार बदल करणार आहे.
 
त्याबाबत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारले असता त्यांनी मात्र वादग्रस्त विधान करून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीट चोळण्याचे काम केले आहे. एक रुपया भिकारीही घेत नाही मात्र आम्ही एका रुपयात पीकविमा देत असल्याचे कोकाटे म्हणालेत. कोकाटेंच्या वादग्रस्त विधानाची त्यांच्याच पक्षाकडून दखल घेण्यात आली आहे. पीकविमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार नियमात बदल करणार आहे. मात्र त्यामुळे बळीराजा शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.